खिडकी

काही वेळा काही गोष्टी उगाच आठवतात आणि मग समोरचं सगळं धुसर दिसायला लागतं. अश्यावेळी आपल्याला चष्मा आहे ह्याचं बरं वाटतं. तो काढायच्या, पुसायच्या, नीट करायच्या बहाण्याने डोळे पुसता येतात अश्रु ओघळण्याधीच! हे सुद्धा आत्ता उगाच आठवलेलं काहीतरी...

आज अलिबागहुन निघाले तेव्हा ऊन-सावली बघुन, रिलेटिवली स्वच्छ खिड्की पकडुन बसमधे बसले. भाग्य लागतं बाबा अशी खिडकी मिळायला. बस सुटायची वाट बघत मी गाणी ऐकायला लागले. अचानक खिडकीखालुन आवाज आला "तुला काही आणुन देउ का?" खाली एक साधारण पंचविशीचा नेभळा मुलगा उभा होता. मला का विचारतोय? इतक्यात माझ्या शेजारहुन एक गोडसा आवाज आला.. "नको ना.. थांब ना इथेच". माझ्या बाजुच्या सीटवर एक नाजुकशी अशीच विशी-पंचविशीची मुलगी येउन बसलेली होती. "नाही मी आणतो काहीतरी.. भुक लागेल तुला" तो मागे सरकत म्हणाला. "थांब की.. मी खाली उतरु?" ती अर्धवट उभं राहत म्हणाली.. तो खाली गोंधळलेला.. आणि मी मधल्यामधे आपण काय करावं? कुठे बघावं? परिस्थितीत...

त्यालाही चष्मा.. पण मला त्या काचांपलीकडचे भरलेले डोळे दिसले म्हणुन धडपड होती तिथुन निघायची त्याची बहुतेक.. तिलाही दिसले असतीलच. तिचाही आवाज कापरा होताच! दोघंही शांत झाली एकदम.. एकमेकांकडे बघत. "फोन करत रहा हं" त्याने तिला सांगितलं आणि हात पुढे केला. मी मागे सरकले. ती उभी राहिली हात पुढे करुन पण तरी त्यांना ते जमेना. मला वाटलं, " उठावं आणि तिला बसु द्यावं...पण का म्हणुन? मी नाही जा... मी पळत येउन पकडलेली खिडकी आहे बा! की द्यावी? परत मिळेल का आपल्याला? की सांगावं पेणपर्यंत बस?" ...

दोघंही माझ्याकडे बघुन हसली. मी पण हसले मग माझी जागा बदलत आणि मी माझा चष्मा नीट करत कधीतरी घेतलेल्या अश्याच एखाद्या निरोपाच्या उगाच आलेल्या आठवणी पुसल्या.

Comments

sahdeV said…
wah wah
chhan lihilay
Yogini said…
gadi sutali rumal halale..
kshanat dole tachakan ole..

gadi sutali halawe chehare
kshan sadhay hasare zale..
Maithili said…
mastach.......
kase jamte ga tula.... itke sunder lihayala..?
BTW tula maza mail milala kaa...????
सुंदर !
कधीतरी घेतलेल्या अश्याच एखाद्या निरोपाच्या उगाच आलेल्या आठवणी पुसल्या..... कसल्या ताज्यातवान्या झाल्या !
sagar said…
बऱ्याचदा गाडी लवकर हलतच नाही. या असल्या रेशीम धाग्यांचे anchor त्यामागे कारण असणार बहुतेक.
Jaswandi said…
@Vedhas.. Thank you

@Jayanti... Sandeep Kharela kasa he shabdat mandata yeta hyacha kayam ashcharya vatata mala

@ Maithili.. Thank you Dear
Jaswandi said…
Pethe kaka, Thank you.. bahutek tumhi pahilyandach mazya blogvar comment kelit.. khup chhan vatla tumchi comment pahun


@Sagar.. aajchya diwasacha dusra "sooo true" :)
Thank you
sagar said…
:) तुला पकडता येतात हे असले क्षण. निसटू नको देऊस आणि कोण म्हणालं "blogs च्या pages मध्ये मोरपीस,वाळलं फुल किंवा पापणीचा केस जपून नाही ठेवता येत" असं ?
असेच मांडत राहा जपले जातील आपसूक :D
Jaswandi said…
@ Sagar.. Thank you re.. ase khup kami bloggers ahet, jyanchya comments vachun pan "kya baat hain" mhanavasa vatata.. :)

btw.. hya ekach blogvar comment karavi asa kahi nahi.. dusrya jaswandachya phulanchya blogvar pan karu shaktos :P

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B