कधी कळावं?

किती प्रार्थना अशाच तरंगत राहिल्या असतील आकाशात...
किती स्वप्नं तशीच बांधलेली राहिली असतील एखाद्या दर्ग्यात किंवा कुठल्याश्या पवित्र झाडाच्या फांद्यांवर...
किती पापण्यांचे केस अजुनही उडत असतील, इच्छांचे दुत बनुन..
तुटलेल्या ता-यांच्या खच पडलेला असेल, आणि त्या ता-याच्या तुकड्यांबरोबर किती "wishes" निखळुन अडकल्या असतील ओझोनच्याही वर कुठेतरी...

कधीतरी "दे वचन" म्हणुन पुढे आलेल्या त्या गो-या हातावर एखादा दुप्पट मोठा हात हळुवार पडत म्हणाला असेल "दिलं वचन"... कधीतरी त्या काळ्याभोर डोळ्यांमधे खोल खोल जात निळे डोळे म्हणाले असतील... "तुझी शप्पत्थ".... किंवा कधीतरी फक्त चेह-यावरचं एक आश्वासक smile..

किती वचनांचे, स्वप्नांचे, इच्छांचे आता कोणी वालीही उरले नसतील... किती शपथांचं अस्तित्वच नाकारलं गेलं असेल...

ब्रुस देवाला म्हणतो.. इतक्या prayers होत्या..." I just gave them all what they want. "
त्यावर देव त्याला विचारतो..." Yeah. But since when does anyone have a clue about what they want? "

आपल्याला नक्की काय हवं आहे? हे कधी कळणार?
अजुन असे किती बोळे आपण त्या इच्छा-आकांक्षांच्या ढीगात फेकत बसणार?

Comments

sagar said…
एक विसरलोच..
ते 'ब्रूस' चा नाही कळलं ब्वा !! कोणत्या बुक मधलं आहे हे ? search केलं पण नाही मिळालं..
veerendra said…
अगदी सहज मनातलं लिहिलं आहेस ..
आणि ब्रूस च उदाहरण तर चपखल !
Jaswandi said…
Bruce Almighty film ahe Jim Carrey chi!
Jaswandi said…
This comment has been removed by the author.
Satish said…
surekh... agadi manatal blogvar...
Maithili said…
आपल्याला नक्की काय हवं आहे? हे कधी कळणार?
अजुन असे किती बोळे आपण त्या इच्छा-आकांक्षांच्या ढीगात फेकत बसणार?...Apratim...!!!
N said…
..... :)
chan lihilay ga!

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)