Thank You
प्रिय देवा,
Thanks a ton man! I mean, seriously शतश: आभार.. आजवर काय काय नाही मागितलं तुझ्याकडे.. अगदी हरवलेला चष्मा सापडु दे..पासुन मेक्सिकोचा एक तरी गोल होऊ दे पर्यन्त
मी अभ्यास केलेल्यावरच पेपर येऊ दे पासुन.. (मला कंटाळा आलाय पुढची उदाहरणं द्यायचा.. तुला माहित्ये मी काय काय मागितलं आहे ते)
आज तुझ्यासमोर येउन उभी राहिले देवळात तेव्हा काय मागावं आठवलं नाही.. जनरल "मी देवाला भक्ती दिली.. कायम का मागावं काही?" टाईप बोलणारे लोक असतात ना, त्यांचा खरेपणा तुलाही माहित्ये अन मलाही! युफोरिआची प्रार्थना आठवली.."Thought काय भारी आहे" हे म्हणण्याइतकी प्रार्थना मस्त आहे रे ती.. त्यावर नंतर बोलु..संपुर्ण आयुष्य पडलं आहे.. आयला,आयुष्यानंतरही, मेल्यानंतरही तू असणारच ना माझ्याबरोबर.. दचकवुन गेला हा विचार क्षणभर!
तर आजचं हे आभारपत्र का आहे.. मला त्या प्रत्येक मागण्यांसाठी तुला धन्यवाद म्हणायचं आहे.. ज्या ज्या तू पुर्ण केल्या नाहीस! no no.. sarcasm नाही, मनापासुन बॉस.. एकदम मनापासुन.. मी इतक्या येडपट मागण्या करत आल्ये.. सगळ्या पुर्ण केल्या असत्यास तर कठीणच होतं राव.. आज अचानक देवळात उभी असताना ते आठवलं.. मी कित्ती क्युट ते कित्ती क्रुर.. काहीही केलेल्या मागण्याही आठवल्या...काही मागितलेल्या गोष्टी त्यावेळेसाठी रास्तही होत्या.. तू त्या नाही दिल्यास म्हणुन तुला शिव्या घालुन तुझ्यापासुन तोंडही फिरवलं होतं मी! पण गड्या..बरोबर होतास तू तेव्हा...
मला हे realise झालं आहे म्हणजे मी आता काहीही मागणं सोडुन देईन असं होत नाही.. मी मागतच राहणार.. यार हक्काचा देव आहेस तू.. कोणी काही मागितलंच नाही तुझ्याकडे तर तुलातरी जाईल का भाकरतुकडा, किंवा पोहे, किंवा अमृत... तुला माहित्ये मला काय नक्की द्यायचं आहे ते.. तू ते दे.. मागितलं तरी किंवा न मागताही...
Love you
तेजु

Comments
मी अजून पण मागतो - हरवलेलं पाकीट सापडू दे हे अगदी आत्ता आत्ता मागितल्याच आठवत आहे मला
उगाच नाही काही जण "देणारा तो देव" अस म्हणत :)