चिऊताई दार उघड...

एक होती तेजू अन एक होता ब्लॉग... एकदा काय झालं, तेजू लिहायची बंदच झाली... मग काय ब्लॉग आला   दाराशी... आणि वाजवली ठणाणा दारावरची बेल..

"तेजुबाई तेजुबाई.... ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा ऑफिसचा  डबा करून घेऊन दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा झाडांना पाणी घालू दे" 

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा स्काईप, फेसबुक, ट्विटर, बझफीड , Candy crush सगळ्यात बराच वेळ मोडू दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा घर थोडं आवरून घेऊ दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा अर्धा तास झोप काढू दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा... snooz..." 

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. थांब जरा बाहेर फिरून येऊ दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. जरा टाईमपास करू दे"

"तेजुबाई तेजुबाई .. ब्लॉग लिही"

"हो रे.. whatever!"


लहानपणी माझी सगळ्यात नावडती गोष्ट... मला खूप काही कळायचं नाही पण चिमणीचा राग यायचा प्रचंड... आणि आता स्वतःचा... बिनकामाच्या असंख्य कामांत अडकवून घ्यायचं स्वतःलाच... कारण द्यायची खरी-खोटी! सव्वा लाखाची मुठ झाकून ठेवत लिहिणं टाळत जायचं फक्त!!Comments

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second