१ ते ५०

तिला बोलायचं असायचं खूप...
पण शब्द नव्हते तिच्याकडे तेवढे.
मग माझ्या मांडीवर डोकं टेकवत म्हणायची,
" एक ते पन्नासपैकी एक आकडा मी मनात धरते
तू ओळख"
मी जो आकडा सांगेन तितपर्यंत मोजायची मग ती हळुहळू
"१...२...३...४...
अंहं .. पुढचा आकडा" 
कायमच मी सांगितलेला पन्नासावा आकडा असायचा तिचा! 

वर्ष झाली ह्याला...
आता मीच सांगतो कधीतरी 
तिला मनात आकडा धरायला,
आणि पहिल्याच चान्समध्ये 
बरोबरही ओळखतो!
आम्ही बाप-लेक मोठे झालोयत आता...

Comments

Vijay Shendge said…
छान कविता.

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second