Education...:)

पंख्याच्या पात्या स्पष्ट दिसाव्या इतक्या हळु स्पीडने फिरणारा पंखा डोक्यावर...
घर्र..खर्र.घर्र..खर्र आवाज आता सवयीचा झालेला...

गेले दोन-तीन महिने केरसुणी ह्या वर्गात आली नाहीये ह्याची साक्ष द्यायला टेबलावर धुळ येउन बसली होती!
भाविका त्याच टेबलावर खट....खट...खट तिचं लेक्सि-५ पेन वाजवत बसली होती...
मानसीचा हलणारा पाय अक्खं टेबल हलवत होता...
रसिकाची मी मोजायला सुरुवात केल्यापासुनची ११वी जांभई...
रुचा तिच्याच वहीत तिचंच नाव साधारण पन्नासाव्यांदा लिहीत होती!
अमृता समोरच्या बाकावर सगळा जोर देऊन तिची खुर्ची मागच्या दोन पायांवर बॅलेन्स करायचा खेळ खेळत होती...
समिधा भिंतीवरच्या पालीकडे टक लावुन बघत होती...

इतक्यात प्रोफ. आले. खुर्च्याचा आवाज झाला... सरांनी फळा पुसला, काहीतरी खरडलं...काहीतरी बोलायला सुरुवात केली....

पाल तशीच तिथे ढिम्म... अमृता आता पुढच्या दोन पायांवर खुर्ची बॅलेन्स करायच्या प्रयत्नात!
रुचाचं दुसरं पान, आता बहुतेक सरांच्या शर्टवरचं डिझाईन...
रसिकाचा २३वी जांभई रोखुन धरण्याचा निष्फळ प्रयत्न...
मानसीच्या पायाचा वाढलेला स्पीड...
खट...खट...खट...
घर्र..खर्र..घर्र...खर्र

Comments

Sud said…
looks like things haven't changed much since I left school!
कोहम said…
Post vachala, kahi khas nahi mhaNun pudhe JaNar itakyat sheershak vachala aNi lakhkha prakash paDala. Thodakya shabdat, pochavayacha te pochavalas. well done!
Sneha said…
dolyapudhe chitra ubh kelas..
aani baryach aathavaninna ujaLa pan aalaa
Dk said…
"ओह... काय लिहितेस तू! व्वा!! तू एका आख्या कुटुंबाला bloggerr केलस. म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली :)

[दिवे घ्या बरका :) ]

"इतरांच्या चुकां वरूनही शिकायला हवं, सगळ्या चुका तुम्हीच करून शिके पर्यंत तुम्ही जिवंत राहाल ह्याची खात्री नाही."
Jaswandi said…
@sud... lets hope, goshti kadhitari tari change hotil :)

@koham... thanx

@sneha... thanx..tu pan asa karaychis kay shala-collegat? :P

@deep... thanx for ur comment
"इतरांच्या चुकां वरूनही शिकायला हवं, सगळ्या चुका तुम्हीच करून शिके पर्यंत तुम्ही जिवंत राहाल ह्याची खात्री नाही."
i din get u...hyacha artha kay?
Yawning Dog said…
हे कसले मस्त आहे
"अमृता समोरच्या बाकावर सगळा जोर देऊन तिची खुर्ची मागच्या दोन पायांवर बॅलेन्स करायचा खेळ खेळत होती..."

मी सदासर्वदा असेच करत बसलो असतो, खूप मजा येते यार :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B