something weirdly दैवी!

देव?.... ठीक आहे .... असेलही खराखुरा!
rather मला हवा तेव्हा तो खरा आहे... नाहीतर नाही!

आणि देवळातल्या मुर्तीत? गर्दीतुन जाऊन ५ सेकंद दिसणारा देव आहे?
मुळ्ळीच नाही... I agree की त्या वातावरणात काहीतरी असतं...

पण तो देव असतो का?
माहित नाही!!

..... हे मी स्वतःशी बोलत होते बसमध्ये. पुण्याला येताना कोल्हापुरला बस बदलायची होती. कोल्हापुरला उतरणार आहोतच तर देवीच दर्शन घेऊया असा एक विचार डोक्यात आला... आणि तो विचार बदलण्यासाठी मी स्वतःशी वाद घालत होते Direct बिचा-या देवाच्या अस्तित्वावरच!

..... कोल्हापुर stand ला उतरले, तिथे "पुणे पुणे" ओरडत private busवाले उभेच होते. एकाशी थोडं bargaining केलं, तो बस दाखवायला घेउन जायला लागला... त्याच्यामागे जात असताना मधे रिक्षा stand होता... मी अचानक एका रिक्षापाशी वळले...

"देवीच्या देवळात जायचय"
रिक्षावाल्याने पाहिलं "२५ रुपये होतील"
मी बावळटासारखं काहीही न म्हणता "बरं, चला लवकर" म्हणुन रिक्षात बसले.

मलाच एकदम काहीतरी वाटायला लागलं... असं काय केलं मी? २५ रुपये काय? परत मला कोल्हापुरातले रस्ते वगैरे पण माहित नाहीत, पण रिक्षावाले काका चांगले वाटत होते, देवीचा फोटो होता त्यांच्या रिक्षात... आधी सवयीने देवीने कडे बघुन हसणार होते जसं घरच्या देवांकडे बघुन करते, पण मग मनातल्या मनात देवीचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. उगाच risk का घ्या? देवी दिसायला नेहेमीच danger वाटत आली मला! तिच्याशी बाकी देवांसारखी मैत्री नाही करता येणार!

(हे वाचताना तुम्हाला weird वाटत असेल.. पण घाबरू नका.. सद्यस्थितीत मला schizophrenia नाही! :) )

देवळापाशी आले. रांग असेल तर सरळ मुखदर्शन घेऊया हा विचार होता.... आणि बघते तर कुठेच रांग नाही. रविवारच्या दुपारी, गौरींच्या दिवशी रांग नाही? देवळाच्या मागच्या दरवाज्याने आत गेले... ३ महिन्यांपुर्वीच बाबांबरोबर देवळात आले होते तेव्हा तिथल्या वरुण देवतेच्या मुर्तीला म्हणाले होते "पाऊस पाड रे आता"... ह्यावेळेला त्याला "thank you" म्हणाले.

पण कुठेही रांग नाही बघुन मला आश्चर्यच वाटल होतं. मुखदर्शनाच्या भागात खुप लोकं बसली होती. मी पुढे गेले, पितळी उंबरठ्यापर्यन्त पोचले असेन आणि देवीच्या आरतीला सुरुवात झाली! मी अगदी समोरच... देवी अगदी स्पष्ट दिसत नसली तरी पिवळ्या साडीतली तिची प्रसन्न मुद्रा दिसत होती.

घंटा, टाळ्या, आरती, देवी.... ते सगळं वातावरण भारावुन टाकणारं होतं.... माझे डोळे भरुन आले.
अचानक रिक्षात बसणं, वाद न घालता देवळात येणं, रांग नसणं आणि आत्ता मी देवीसमोर उभी!

मला माझ्या heartbeats ऐकु येत होत्या... छोट्या शिशु मधे पहिल्याच दिवशी मुल जातं तेव्हा ते ज्या नजरेने आजुबाजुला बघत असतं तसं मी इथे तिथे बघत होते. देवीला नमस्कार केला आणि थोड्यावेळाने देवळातुन बाहेर पडले. standवर आले, पुण्याच्या बसमधे बसले....

.....
देव?.... ठीक आहे .... असं आहे काहीतरी!
rather मला हवा तेव्हा तो खरा आहे... आणि इतरवेळीही, त्याला माहित्ये मी!
माझ्याकडे लक्ष आहे त्याचं!

आणि देवळातल्या मुर्तीत? गर्दीतुन जाऊन ५ सेकंद दिसणारा देव आहे?
नसायला काय झालं? मी अनुभवली ती देवीच होती... ती शक्तीच होती!
.....

खरं तरं "नवाकाळ"मधे छापायला देण्यासारखा अनुभव आहे. मी असं काही वाचलं की हसायचे . अजुनही हसते!
पण कधी कधी अश्या ह्या गोष्टी घडतात ज्या जाणिव करुन देतात...
"ताई, तुम्ही जे हसताय ना त्यावरही आमचं लक्ष आहे बरं का?"

Comments

नवभारत टाइम्समध्ये छापायचा कशाला ?

इतर ठिकाणंही आहेत की.

अन् माध्यम क्षेत्रात आहेस. असं कमी लेखून बोलू नको बे कुणाला...

मस्त झालंय.

आत्तापर्यंतच्या इथल्या सगळ्या पोस्टांपैकी बेश्ट.
Jaswandi said…
नवाकाळ म्हणायचा होता.
आणि कमी लेखुन नाही बोलते कोणाला पण तरीही! आत्तापर्यंत नवाकाळ मधेच असे अनुभव वाचल्येत म्हणुन...

धन्यवाद!! :)
chhaan ga. pan tu ashi kali ka padaliyes?
वा ग सोने!!
बर तुला ’खो’ दिलाय. तपशील
http://jeevaghene.blogspot.com/
बघ.
Monsieur K said…
>>> आधी सवयीने देवीने कडे बघुन हसणार होते जसं घरच्या देवांकडे बघुन करते, पण मग मनातल्या मनात देवीचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. उगाच risk का घ्या? देवी दिसायला नेहेमीच danger वाटत आली मला! तिच्याशी बाकी देवांसारखी मैत्री नाही करता येणार!

>>> ३ महिन्यांपुर्वीच बाबांबरोबर देवळात आले होते तेव्हा तिथल्या वरुण देवतेच्या मुर्तीला म्हणाले होते "पाऊस पाड रे आता"... ह्यावेळेला त्याला "thank you" म्हणाले.

:))))
mast lihila aahes! kharach mast aahe ekdam! :)
Jaswandi said…
Thank you Neeraja.. pan kho milala ahe ga adhich.. jyana ajun milala nahiye tyana de na!

Thanks Ketan!
Deep said…
waaa... baaki devaak kaaljee :) phaar chaan lihily haa tuzyaa an devaatlaa muk smvaad....

Well what do we really mean by god?
the force which is always active in our mind... na?
shinu said…
छान झालय संवाद. नवाकाळमध्ये छापायला दिला नाहीस ते एका परिनं बरंच झालं म्हणा, मग इथे वाचता नसतं आलं :) विनोदाचा भाग बाजुला ठेवून पोस्ट एकदम झकास जमली आहे.
Samved said…
Check coverpage of MaTa Diwali Ank...

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second