I have a Secret...
असं म्हणणारा अक्षय कुमार बघुन मला हसुचं आलं... शाळेत असताना असं काही झाल्यावर आम्ही "same-pinch" करायला धावायचो. मी मनातल्या मनात ओरडले.. "हेय्य, माझ्याकडे पण किनई एक सिक्रेट्ट आहे.. एकदम टॉप सिक्रेट!"... आधी मुद्दामहुन मी ते कोणाला सांगितलं नाही... आणि आता मला ते आख्ख्या जगाला सांगायचं आहे, पण कोणाला ऐकायचं नाहीये किंवा ज्यांना ऐकायचं आहे त्यांना मला ह्या सिक्रेटचे पहिले श्रोते बनवायचं नाही आहे. :(
"दोन वर्षांपासुन मी वापरत असणा-या माझ्या चपला अखेरीस फाटल्या" हे मला ज्यांना मनापासुन सांगायचं आहे त्या सगळ्या व्यक्ती हल्ली मला भेटल्यावर स्वत:च्या नवीन चपला दाखवतात. त्यांच्या नवीन चपलांच्या आनंदावर मी माझ्या फाटक्या चपलांचा चिखल कसा उडवू शकते? म्हणुन मी शांत आहे... सिक्रेट अजुन सिक्रेट आहे... तुम्हीही कोणाला सांगु नका!
आज काडेपेटीवर एक वाक्य वाचलं " there are 2 types of secrets... one is not worth keeping and other is too good to keep"... राजाच्या शिंगांची गोष्ट आठवली आणि म्हंटलं आपल्या ब्लॉगलाच झाडाचा बुंधा समजुया! :)
काही कळलं का? नाही का? बरं... ही सिक्रेट तुमच्यासाठी नव्हती!

Comments
naahi jhepla :(((
काही कळलं का? नाही का? बरं... >>> aaata tu swagtch bolnaar ka? chaludyaa malahee राजाच्या शिंगांची गोष्ट kaahee zeplee naahi :(
mi phaarshyaa raajaa raanichya katha vaachat naahe.
sadar samjvaave hi vinantee. :)
Aso, tula navin yahunahi premal chapla lavakar milot hi shubhechcha. :)
ketan deep lahan pani goshti nahi aikalyat ka re?