शब्द
तुझ्याशी खूप खूप बोलायचं होतं रे, पण ना तेव्हा शब्दच आठवत नव्हते.. सापडेचना माहित्ये काही?
मग मी थांबले.. शब्द शोधले, काही खोडले, काही पुन्हा शोधले, शब्द जुळवले .. मग लक्षात आलं, आपण इतके कष्ट उगाच घेतो आहोत.. शब्दांशिवायपण सांगु शकते की तुला जे सांगायचं आहे ते!
ह्यामधे खूप वेळ गेला का रे?
कारण आता तुच सापडत नाहीयेस...

Comments