Dollar Chocolate

आठवणींची जाम गंमत असते.. कधी कुठे कश्या येतील आणि काय सोबत आणतील सांगता येत नाही..

काल अमोलनी वेगसच्या कसिनो चिपची चॉकलेट घेतली. मला इतका प्रचंड आनंद झाला तेव्हा , मला स्वतःलाच गंमत वाटत होती. आणि वेगसच्या विमानतळावर असतानाच मी दादरच्या एका दुकानात पोचले होते.

इय्यत्ता तिसरी- गीताई-पठण स्पर्धा- किंग जॉर्ज शाळा... मी जिंकले नव्हतेच पण बाबांनी त्या शाळेतून बाहेर पडल्यावर बाहेरच्या दुकानातून मला डॉलरसारखी दिसणारी चॉकलेट घेऊन दिली होती. डॉलर तसं दिसत नाही हे आता कळलं आहे पण तेव्हा माझ्यासाठी ते तसंच दिसत होतं.. सोनेरी गोल  आणि आतमध्ये पातळ चॉकलेटची चकती... बाहेरची चकती सांभाळून ठेवली होती किती दिवस. अलिबागला नाही मिळायचं तसं चॉकलेट, सगळ्या मैत्रिणींना दाखवलं होतं ते.. मुंबईबद्दलच्या फुशारक्याही मारल्या असतील तेव्हा मी... त्यानंतर किती वर्ष मिळालं नव्हतं ते तसं चॉकलेट...नंतर मुंबईत राहूनही कधी घ्यायचं लक्षात नाही आलं..

काल मात्र अमोलनी चॉकलेट आणलं आणि वेगसच्या विमानतळावर बसून माझ्या मनात गीताई चालू झाली..

धृतराष्ट्र म्हणाला
त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ 
संजय म्हणाला...

Comments

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second