Stranger...

"AC लावतोय... काच बंद करशील?"


"AC लावायलाच हवा का?" मी त्याला त्रासिक नजरेने विचारलं. त्याने काही न बोलता गाडी सुरु केली.
त्याने त्याची कुठलीशी कर्नाटकी क्लासिकलची CD लावली. मला ती गाडीत ऐकायला आवडत नाही माहित असुन! त्याला AC लागतो, माहित असुन मी कुठे खिडकी लावली?

सिग्नलला गाडी थांबली, गेली ५ मिनीटं आम्ही एकमेकांशी बोल्लोच नव्हतो...
एकदम अनोळखी असल्यासारखं...

आमच्याच बाजुला एका शाळेची व्हॅन येउन उभी राहिली. dull green रंगाचा uniform, साधारण ८वी-९वी मधली मुलं होती. माझ्या बाजुच्या खिडकीतला मुलगा झोपाळलेला होता, अचानक माझ्याकडे बघितलं त्याने... खरं तर अशी अचनक नजरानजर झाली की माणुस दुसरीकडे बघायला लागतो. पण आम्ही दोघांनीही असं केलं नाही. एकमेकांकडे बघुन आम्ही फक्त हसलो. असचं...

सिग्नल सुटला... माझं लक्ष अजुनही त्या व्हॅनकडेच होतं.
"तुला कुठे सोडु?" ह्याने विचारलं
"हो" मी उत्तर दिलं... त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे रागाने पहिलं... काहीतरी चुकलं उत्तर देताना हे मला खुप उशिरा कळलं!

पुढच्या सिग्नलला सुद्धा ती व्हॅन होतीच... पण आता ह्याच्या बाजुला, त्यामुळे तो गाडीतला बंड्या आणि मी एकमेकांना दिसत नव्हतो. मी वाकुन, पुढे मागे होऊन बघायचा प्रयत्न केला, सिग्नल सुटताना तो दिसला... त्यालाही मी दिसले... मी त्याला हात केला...

"तू हे काय करत्येस?"
"सहज..असंच" मी हसुन उत्तर दिलं!
"वेडी झाल्येस तू"
मी फक्त हसले... त्याने हसुन पाहिलं परत...
"CD बदलु?" हा chance मी कसा सोडु?
"AC लाऊ देणारेस?" तो तरी कसा सोडेल हा त्याचा chance?
"जिथपर्यन्त ती व्हॅन आपल्यासोबत आहे.. तोपर्यन्त थांब ना"

पण ह्याच्याशी बोलताना ती व्हॅन दिसेनाशी झाली होती...
मी मुकाट्याने काच वर केली... त्याने CD बदलली!

आता अनोळखी कोणीच नव्हतं!

Comments

Abhijit Bathe said…
आयला! सही!!
(लेखाच्या साईझचा अंदाज घेऊन मी कमेंट आणखी छोटी करण्याचा प्रयत्न केला, पण जमला नाही! :)))
Monsieur K said…
jabri lihila aahes! :)
Vidya Bhutkar said…
Aata amhi anolakhi jhalo ki tujhi hi post athavel nakki. mag kunich anolakhi rahnar nahi. :-)
Great!
-Vidya.
Tulip said…
क्या बात हैं! सही झालय.
Jaswandi said…
Thank you everybody! :)
Parag said…
Masta lihilays.. :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)