समाधान

सकाळपासुनच मस्त पाऊस पडत होता. एकदम छान वाटत होतं... खुप मुसळधारही नाही आणि छत्रीशिवाय भागणार नाही असा छान पाऊस! मी मैत्रिणीला म्हणाले "मस्त पाऊस आहे नं?" ती पावसाकडे बघत म्हणाली "कसला पिरपि-या आहे गं, जरा मुसळधार हवा.. हा असा पाऊस ना एक्दम bore असतो बघ".

माझ्या प्रोफेसरनी भेटायला बोलावलं. त्या मन लावुन बोलत होत्या. जवळ जवळ ४० वर्षं त्यांनी लहान मुलांसाठी काम करायला दिली आहेत. " Dear, कल्पना चांगली आहे. पण आपण किती लोकांपर्यंत पोचणार? १००-२०० मुलांच्या lifeला touch करणं बास झाला का? हम जो कुछ करे..जितने ज्यादा बच्चोंतक हमारा काम जायेगा उतना अच्छा होगा... जास्तीत जास्त पोरांना फायदा व्हायला पहिजे" त्यांच्या english-हिन्दी-मराठीत त्या बोलत होत्या. त्यांच्या डोळ्यांत तळमळ होती. त्यांनी इतकं काम केलं असुनही त्यांना ते पुरेसं वाटत नव्हतं, समाधान नव्हतं... बाहेर आता मुसळधार पाऊस होता. "छान पाऊस आहे" असं म्हणत अस्वस्थपणे बाहेर बघत राहिल्या.

घरी येताना एका मित्र भेटला, त्यांच्या Skoda Laura मधुन त्याने lift दिली. "तेजु.. कहा सड रही है? देख मैने तो Dad की factory चलाना शुरु कर दिया.. अब बस expand करते रहियो... रिसर्च-विसर्च छोड दे..." मग त्याने तो कसा श्रीमंत आहे ह्यावर प्रवचन दिलं. एका सिग्नलवर गाडी थांबली. समोर एक छोटा मुलगा येउन उभा राहिला. कोलांट्या उड्या मारुन दाखवल्या आणि पैसे मागायला आला. मित्राने गाडीची काच खाली केली. २ रुपयांचं एक नाणं पोराच्या हातावर ठेवलं. "मै हमेशा इस सिग्नलपे भिखारी लोगको कुछ देता हु... अच्छा लगता है... social responsibility u know.." काच वर करुन तो आता गाणं बदलत होता. किती समाधानी दिसत होता तो. मी Lauraच्या काचेवर असणा-या ओघळांमधुन बाहेर बघत बसले.

Comments

vishal said…
Kathechi kalpana khupach chaan ahe.Malahi lihayachi avad ahe mhanun ek suggest karto ahe. Pavasacha sandarbha pahilya scene madhye alyavar tyachya anushangane katha pudhe jaavi asa sadharna vatat hota. matra pudhachya don prasangamadhye garib mulansathi kaam he focus bante. I think then starting paragraph ( matrinila pavasabaddal bore hone ) should have something about garib mula .

Uttam prayatna ahe !!
hmm. :-(

shekaDo mulansathi itaka veL, aNi energy deun kaam karaNarya baai asamadhani ahet ki ajun khup kahi karayala pahije.

aNi eka garibala 2 rupaye deun apali samajik jababadari purNa keli samajun samadhani vaTun gheNara mitr.

samadhan deNa mahatvacha ki samadhan miLavaNa?

good post.
Dk said…
srkit bola wo sahi hai! dusryansaathee aayshy vechunHI asamadhaanee rahanarya baaiaani skodatla shreemant don rupde deun samadhaane rahanara mitr!! mast lihilys.

***

kadhe taree vaatt mansaachya Asamadhaanche mul tyaachya hwyaasat aste..

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B