Posts

Showing posts from 2008

लाईनीवर येणं...

प्रचंड ताण... आपण पास होऊ की नाही ह्यापासुनची शंका!अजुन ३-४ assignments बाकी! त्यात मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर ३ दिवस हे निव्वळ depression आणि helplessness मधे गेलेले... कॉलेजमधे मी चौकोनी चेहे-याने वावरत असताना, त्या दोघींकडे बघुन कायम आश्चर्य वाटत होतं... "बायांनॊ, तुम्हाला काही tension नाहीये का?" chill मार यार, हो जायेगा... असं "हर फिक्र को धुएं मे" उडवत त्या मला सांगत असतात. सिगरेट ओढल्याने खरचं tension कमी होतं का? आपण try करावं का? ह्या विचारात एक आख्खा दिवस वाया घालवणं... शेवटी आपण try करायलाच हवं म्हणुन ठाम होणं, पण दुकानात सिग्रेट मागायची कशी म्हणुन पाठी फिरणं! कॉलेजमध्ये पोचल्यावर आत्तापर्यंतच्या projects चे marks लावलेले... फक्त मी पुढच्या परीक्षेला बसायला eligible आणि बाकी कोणी नाही... माझा चौकोनी चेहेरा थोडा सरळ होतो... पुढच्या submission साठी तयार होत असतो... त्या दोघी आताचं हे नवीन tension घालवायला नवा ’धुवा’ निर्माण करायला जातात. मी लाईनीवर येत असते...

सावली

सकाळपासुन solliddd tension मधे होते... assignments, submissions, projects, presentations....सगळं एकत्र डोक्यावर पडलेलं, त्यामुळे कपाळावर गेले ३-४ दिवस एक आठी कायमच्या वास्तव्याला आलेली! दुपारी भर उन्हातुन घरी येत असताना रिक्षा, बस, टमटम सगळ्यांनी बंद पुकारल्यासारखी अवस्था... मी चालत येत होते... एका छोट्या पुलावर, सगळी वाहनं (as usual) बापाचा रस्ता असल्यागत जात होती. तेवढ्यात एका गाडीवर मागे बसलेल्या आजोबांची टोपी उडुन खाली पडली... त्यांच्या मुलाने पुढे जाउन गाडी थांबवली, आणि आजोबा उतरुन हळु हळु मागे यायला लागले... त्यांना कठीण होतं रस्त्याच्यामध्धे जाउन ती टोपी घेणं... मग मी पळ्त पुढे गेले, एक-दोन गाड्यांना हात दाखवुन थांबवत ती टोपी उचलली आणि आजोबांना नेउन दिली. त्या पुलावर गाड्या थांबवुन टोपी घेणं हे मस्त adventure होतं! आजोबांनी टोपी घेतली आणि मस्त हसुन "धन्यवाद हं!" म्हणाले. मी पण त्यांच्याकडे हसुन पाहिलं... ते चेहे-यावरचं हासु मला १२:३०च्या उन्हात २.५ किमी. चालत यायला पुरलं! आजोबांच्या टोपीमुळे आम्हा दोघांना सावली मिळाली!

Perfect-2! :)

सकाळी उठले शांतपणे... रात्रीपासुन ipod चालुच होता बहुतेक, कारण उठले तेच कानात "मी राधिका" वाजत होतं... (win 94.6 ची आठवण झाली. सकाळी अंजलीचं अस्मिता कोणी ऐकत असेल तर खरी मज्जा कळेल, सक्काळी सक्काळी "मी राधिका" ऐकायची) मग पुढे १० मिनीटं तशीच लोळत पडले... पुण्यात आता जरा जाणवेलशी थंडी पडायला लागल्ये... आज खुप दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ केली... आता २-३ महिने गार पाण्यात हातही घालता येणार नाही! त्यात नवीन orange flvr चा साबण... संत्र्याइतकं fresh काहीच नसतं! आणि मग आईने केलेला गुरगुट्या मऊ भात! ह्याला म्हणतात सकाळ perfect असणं.... पण तरीही घरातुन निघताना उशिर होतोच! पण आज चिडचिड होत नसते माझी, कारण समोरच्या रिक्षा स्टॅंडवर ८-१० रिक्षा दिसत असतात... कोणीतरी येईलच कॉलेजच्या इथे.... अचानक नजर बाजुला वळते... huhh हिंदुस्थान बेकरीसमोर उभा असलेला नेव्ही ब्ल्यु टी शर्ट! इतका छान दिसणारा मुलगा आपल्या एरियात राहतो? उंच पण ताडमाड नाही... गोरा पण नेभळा गोरा नाही... स्वच्छ पण म्हणुन नाजुक नाही... आणि एक मिनीट..... त्याच्याकडे enticer आहे! हाह.. सहीच आहे! आता असं काही पाहिल्यावर चे...

अलिबागची का?

स्वारगेटवर दुपारच्या अलिबागच्या बसची वाट पाहत मी बसले होते... बाजुला एक आजी येउन बसल्या आणि माझ्याकडे बघुन attitude दिला, त्यांच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी त्यांची पिशवी ठेवली. चेह-यावरुन शिष्ठच वाटल्या जरा! मग हळुच विचारलं "कुठे जायचय गं तुला?" मी सांगितलं "अलिबाग!" तर लगेच हसल्या, मधली पिशवी मांडीवर घेत माझ्या बाजुला सरकत म्हणाल्या... "अलिबाग? तुमची मुग्धा काय गाजत्ये गं! कित्ती गोड आहे, काय सुंदर गाते........." बस येईपर्यन्त अर्धा तास आम्ही मस्त गप्पा मारल्या! थॅंक यू गं मुग्धा! :) माझ्याकडुन तुला वोट्स नक्की! :P

I'm grownup now :(

सकाळ ७:०० बाबा: ऊठ आता, मोठी झालीस... घरातल्या स्त्रीने इतकावेळ झोपणं चांगलं नाही, सासरी लोकं काय म्हणतील? सकाळ ९:०० आई, बाबा: आता तुझ्यावर आमचा हक्क राहिला नाही, मोठी झाल्येस, स्वतःचे निर्णय घेतेस... आम्ही कोण सांगणार तुला काही... दुपार १२:३० आई: आता हळु हळु सगळी कामं शिकायलाच हवीत... स्वयपाक चांगला करता आला पहिजे... दुपार ३:३० बाबा: स्वतःच्या जबाबदा-यांची जाणीव नको का? एवढं मास्टर्स करुन फायदा काय? संध्याकाळ ५:०० मी: चल बाय, टुडल्स... तो: ये टुडल्स क्या है? मी: किसी french word से आया है! Disney channel का word है! :) तो: dear, after certain age you should stop using Disney channel का words... संध्याकाळ ७:३० कोणीतरी काकू: कित्ती मोठी झालीस गं... रात्र १०:३० मी बेडवर झोपले आणि बहीण आरश्यासमोर उभी... मी१: आजकाल आपण रात्री झोपताना आरश्यात बघत नाही... मी२: हं... आपण मोठे झालोय़...

Get set go...

माझे स्वत:चे १-२ वर्षांपुर्वीचे ४-५ डझन फोटो... केतनचं हे पोस्ट... शकिरा आणि बियोन्सेचा Beautiful Liar चा video... कॉलेजमध्ये डिपार्टमेंटसमोर बास्केटबॉल खेळणा-या मुली... कपाटातले आता न घालता येणारे ३-४ आवडते कुर्ते... आशाए, eye of the tiger, all I want... सारखी गाणी असणारी गेल्या काही महिन्यांत अजिबात न वाजलेली ipod वरची playlist... Enough Motivation मिळालं आहे आता... बस्स.. ह्यावेळी ते टिकवायलाच हवं... जुन्या मला आता परत आणायलाच हवं!!

Stranger...

"AC लावतोय... काच बंद करशील?" "AC लावायलाच हवा का?" मी त्याला त्रासिक नजरेने विचारलं. त्याने काही न बोलता गाडी सुरु केली. त्याने त्याची कुठलीशी कर्नाटकी क्लासिकलची CD लावली. मला ती गाडीत ऐकायला आवडत नाही माहित असुन! त्याला AC लागतो, माहित असुन मी कुठे खिडकी लावली? सिग्नलला गाडी थांबली, गेली ५ मिनीटं आम्ही एकमेकांशी बोल्लोच नव्हतो... एकदम अनोळखी असल्यासारखं... आमच्याच बाजुला एका शाळेची व्हॅन येउन उभी राहिली. dull green रंगाचा uniform, साधारण ८वी-९वी मधली मुलं होती. माझ्या बाजुच्या खिडकीतला मुलगा झोपाळलेला होता, अचानक माझ्याकडे बघितलं त्याने... खरं तर अशी अचनक नजरानजर झाली की माणुस दुसरीकडे बघायला लागतो. पण आम्ही दोघांनीही असं केलं नाही. एकमेकांकडे बघुन आम्ही फक्त हसलो. असचं... सिग्नल सुटला... माझं लक्ष अजुनही त्या व्हॅनकडेच होतं. "तुला कुठे सोडु?" ह्याने विचारलं "हो" मी उत्तर दिलं... त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे रागाने पहिलं... काहीतरी चुकलं उत्तर देताना हे मला खुप उशिरा कळलं! पुढच्या सिग्नलला सुद्धा ती व्हॅन होतीच... पण आता ह्याच्या बाजुला, त्याम...

something weirdly दैवी!

देव?.... ठीक आहे .... असेलही खराखुरा! rather मला हवा तेव्हा तो खरा आहे... नाहीतर नाही! आणि देवळातल्या मुर्तीत? गर्दीतुन जाऊन ५ सेकंद दिसणारा देव आहे? मुळ्ळीच नाही... I agree की त्या वातावरणात काहीतरी असतं... पण तो देव असतो का? माहित नाही!! ..... हे मी स्वतःशी बोलत होते बसमध्ये. पुण्याला येताना कोल्हापुरला बस बदलायची होती. कोल्हापुरला उतरणार आहोतच तर देवीच दर्शन घेऊया असा एक विचार डोक्यात आला... आणि तो विचार बदलण्यासाठी मी स्वतःशी वाद घालत होते Direct बिचा-या देवाच्या अस्तित्वावरच! ..... कोल्हापुर stand ला उतरले, तिथे "पुणे पुणे" ओरडत private busवाले उभेच होते. एकाशी थोडं bargaining केलं, तो बस दाखवायला घेउन जायला लागला... त्याच्यामागे जात असताना मधे रिक्षा stand होता... मी अचानक एका रिक्षापाशी वळले... "देवीच्या देवळात जायचय" रिक्षावाल्याने पाहिलं "२५ रुपये होतील" मी बावळटासारखं काहीही न म्हणता "बरं, चला लवकर" म्हणुन रिक्षात बसले. मलाच एकदम काहीतरी वाटायला लागलं... असं काय केलं मी? २५ रुपये काय? परत मला कोल्हापुरातले रस्ते वगैरे पण माहित नाहीत, पण...

आवडलेल्या कविता

चिवचिवणारी वाट असावी चिवचिवणारी वाट असावी दमछाटीची यावी घाटी; घाटीनंतर गडग्यापाशी पार असावा बसण्यासाठी; उठण्याची पण हिरवी शक्ती अंगि असावी करीत वळवळ; मनी असावे मौन सुगंधित, उरी असावी जगण्याची कळ. लाल असावा पुढचा रस्ता; मोह असावा तिठ्यातिठ्यावर; हात नसावा हुकूम कराया! पाठीवरती सर्व हवे घर. पडशीमध्ये हवेत पोहे; ( आणिक चंची-हवीच ती तर!) थालिपिठाचे तुकडे काही, निव्वळ लोणी तयाबरोबर हवीच थोडी लोचट थंडी; ऊन असावे तिरकस पिवळे; क्षितिजामध्ये ऊब असावी! गवत असावे भवती कवळे. बैल असावा आंडिल ढुरकत दूर जुगाईच्या माळावर सह्याद्रिची निळी गोपुरे दूर असावी, दूर, दूरवर... पायामध्ये मुठभर जाडी हवेत पायताण करकरणारे; अन वाटोळी पृथ्वी याचे दुःख असावे सूख पिणारे! - विन्दा करंदीकर --------------------------------------------------------------- रे फुलांची रोख किंमत करु नये कोणी गंध मातीचा कुपीतून भरु नये कोणी वाट शोधावी पहावी, वाट भोगावी गाव आहे दूर म्हणुनी अडु नये कोणी लाख दुःखे पचवुनि येतात जे डोळा दोन त्या थेंबास क्षुल्लक म्हणू नये कोणी आस्तिकाला देव नाही म्हणू नये कोणी एवढेही ठार नास्तिक असू नये कोणी सात फु...

इद्दिरा गाद्धी

आत्ता माझी झाल्ये! अनुस्वार असणारा कोणताही शब्द बोलणं कठीण झालयं... सर्दी हा जगातला सर्वात वाईट आजार असेल, आणि त्यात एखादीला तो दर महिन्याला होत असेल तर अजुन वाईट!

झुटी मुटी मितवा...

अंगात थोडी तापाची कणकण म्हणुन कॉलेजला बुट्टी मारलेली... एकावर एक मस्त २ स्वेटर्स... बाहेर पिरपिरणारा पाऊस... आलं घातलेला गरमागरम वाफाळलेला चहा! खिडकीजवळच्या बेडवर गुरफटलेली चादर... आज किती दिवसांनी त्याचं नाव काचेवरच्या वाफेवर लिहीलं! खुप दिवसांपासुन वाचायचं राहुन गेलेलं पुस्तक हातात... मस्त दुपार!! पण आज एकटं वाटतयं... आयपॉडवरचं एक गाणं छळतयं!! झुटी मुटी मितवा आवन बोले... भादो बोले, कभी सावन बोले... ..

प्रश्न २

मुलांच्या मनावर कशामुळे जास्त वाईट परिणाम होईल? स्पिल्ट्सविला की लोकसभा अधिवेशन? !

प्रश्न!

गेले खुप दिवस confused होते! मला नक्की काय problem आहे हेच कळत नव्हतं! काल सकाळ चाळत असताना, प्रसाद नामजोशीचं "point of view" वाचलं... दर रविवारी ते एका फिल्म घेतात आणि त्या फिल्ममधल्या फिमेल कॅरेक्टर विषयी लिहितात, फिल्म मधला तिचा point of view! खरं तरं सगळे हिंदी सिनेमे हे त्यातल्या हिरॊच्या नावानेच ओळखले जातात, male dominated films...huh!! बाई फक्त एक कारणमात्र हिरोची हिरोगिरी दाखवायला चान्स मिळावा म्हणुन! पण तिचा point of view, जो फिल्म मध्ये दिसत नाही आणि असा असावा हे लिहायची किंवा त्यावर नुसता विचार करायची कल्पना पण भन्नाट आहे. मला आवडलं! काल त्यांनी "प्यासा" वर लिहीलं होतं! दोघींचा point of view... अचानक मला माझा problem लक्षात आला, मी का confused आहे हे ही कळलं! माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल कि नाही ठाउक नाही सध्या प्रश्न सापडला ह्यातच समाधान आहे! मी ही कित्येक दिवस ह्यातच तर गुरफटले आहे....... ..... "स्वार्थ मोठा की त्याग?"

डोक्यातला किडा...

सकाळपासुन डोक्यावर घणाघाती वार होत असल्यासारखं वाटत होतं! घण...घण...घण.... झाशीची राणी बनुन डोक्याला फेटा बांधुन झाला... "अरे वा.. म्हणजे तुला डोकं आहे तर!" असं जेव्हा बहिण् म्हणाली तेव्हा ते वाक्य आधीच दुखत असणाऱ्या डोक्यात घुसलं! असं वाटलं.. डोक्यातली हातोडी काढुन तिच्या डोक्यावर मारावी! तेवढ्यात् त्याचा फोन आला.... आजच् जगातले फालतुएस्ट जोक्स् त्याला आठवत होते, आजच अगदी रोमॅन्टिक व्हायचं होतं.... मग मी नीरस, मी सिरियस, मी दुष्ट...वगैरे वगैरे! मी रागावुन त्याला म्हणाले "आई-बाबा बोलही रहे थे.. इतनी देर सेलपे बात करोगी तो हेडेक तो होगाही ना..." आणि कॉल् कट केला. टीव्ही वर कोणत्यातरी फिल्मची जाहिरात लागली होती, विल स्मिथ त्याच्या त्या मोठ्या बंदुकीसदृश्य वस्तुमधुन समोरच्याच्या डोक्यावर नेम धरतो..आणि मग किळसवाणे हॉलिवुड इफेक्टस्...तो घाणेरडा चिकट हिरवा रस सगळिकडे उडतो, डोक्याच्या चिंध्या... अह्ह्! काहीतरी वेगळं म्हणुन मग इंडिया टुडे हातात घेतला, चाळताना पहिलंच पान निघावं ते सेलफोनच्या जास्त् वापरामुळे वाढणाऱ्या ब्रेन्-ट्युमरच्या धोक्याच्ं!! मला ती विल् स्मिथची बंदुक...

Education...:)

पंख्याच्या पात्या स्पष्ट दिसाव्या इतक्या हळु स्पीडने फिरणारा पंखा डोक्यावर... घर्र..खर्र.घर्र..खर्र आवाज आता सवयीचा झालेला... गेले दोन-तीन महिने केरसुणी ह्या वर्गात आली नाहीये ह्याची साक्ष द्यायला टेबलावर धुळ येउन बसली होती! भाविका त्याच टेबलावर खट....खट...खट तिचं लेक्सि-५ पेन वाजवत बसली होती... मानसीचा हलणारा पाय अक्खं टेबल हलवत होता... रसिकाची मी मोजायला सुरुवात केल्यापासुनची ११वी जांभई... रुचा तिच्याच वहीत तिचंच नाव साधारण पन्नासाव्यांदा लिहीत होती! अमृता समोरच्या बाकावर सगळा जोर देऊन तिची खुर्ची मागच्या दोन पायांवर बॅलेन्स करायचा खेळ खेळत होती... समिधा भिंतीवरच्या पालीकडे टक लावुन बघत होती... इतक्यात प्रोफ. आले. खुर्च्याचा आवाज झाला... सरांनी फळा पुसला, काहीतरी खरडलं...काहीतरी बोलायला सुरुवात केली.... पाल तशीच तिथे ढिम्म... अमृता आता पुढच्या दोन पायांवर खुर्ची बॅलेन्स करायच्या प्रयत्नात! रुचाचं दुसरं पान, आता बहुतेक सरांच्या शर्टवरचं डिझाईन... रसिकाचा २३वी जांभई रोखुन धरण्याचा निष्फळ प्रयत्न... मानसीच्या पायाचा वाढलेला स्पीड... खट...खट...खट... घर्र..खर्र..घर्र...खर्र

बावरा मन...

Get this widget | Track details | eSnips Social DNA second year ला होते तेव्हा! भरपुर स्वप्नं टिकुन होती तोपर्यन्त... मी खरचं खुप काही करु शकते याचा विश्वास होता! मला कोणी विचारलं की "काय मग, काय ठरवलं? काय करणार पुढे?" माझ्याकडे अनेक उत्तरं होती. समोरचा माणुस बघुन मी उत्तर द्यायचे! copy writing, journalism, UPSC, Social work, radio jocky, research...etc etc मलाच माझा sollidd अभिमान वगैरे वाटायचा. मी ordinary नाही, ह्यावर माझा ठाम विश्वास होता! (आजही थोडा आहे) ते वय मस्त असतं, मी काय खुप मोठी झाले नसले तरी ती phase मागे पडली आता! तर हे गाणं तेव्हा पहिल्यांदा ऐकलं, आणि प्रेमात पडले... ह्या गाण्याचा!! मला गाता येतं, पण संगीतामधलं काही खास कळतं नाही... हे गाणं माझ्यातल्या "गायिकेचा" ego booster आहे.. मला हे गाणं माझ्या आवाजात आवडतं... आणि माझ्या सगळ्या वेड्या कल्पना ह्या गाण्यात capture झाल्यात, जादु आहे हे गाणं!! गेल्या आठवड्यात मला हे गाणं मिर्चीत गायला सांगितलं, खूsssप्प दिवसानी गायले! कायम गडबड असणारं office २ मिनिटं शांत होतं. गाणं संपल्यावर टाळ्...

colours!

काल आम्ही एक अर्ध्या दिवसाचा "arts activities camp" घेतला एके ठिकाणी! मला आणि अमृताला चिल्ल्या-पिल्या १० मुला-मुलींचा ग्रुप मिळाला होता, १ली-२रीतली गोंडस मुलं! आम्ही त्यांना thumb-painting शिकवणार होतो. पण आयत्यावेळी लक्षात आलं की १० पैकी २-३च जणांकडे water colours आहेत. मग जरा मी टिपीकल म्हणजे अतिटिपीकल "ताईपणा" दाखवला..."आपण सगळे friends आहोत की नाही? मग आपण colours share करायचे ना आपल्या friends बरोबर?" (दुर्दैवानं मुलांना असचं मिंग्लिश कळतं हल्ली) ज्यांच्याकडे रंग होते त्यांनी माना डोलावल्या. आम्ही सगळ्यांनी, म्हणजे ती १० पिल्लं आणि आम्ही २ ताया, रंगकाम सुरू केलं. रंगाच्या मालकिणीपैकी एकीचे रंग फोडलेले नव्हते, मीच त्याच plastic cover काढलं...आणि मग सगळे जण नवीन-नवीन म्हणुन तिचेच रंग वापरायला लागले. ती मधेच हळुच माझ्यापाशी येऊन तिच्या गोड पडक्या आवाजात म्हणाली "ताई, सगळे माझेच रंग वापरतायत". मी आणि अमृताने एकमेकींकडॆ पाहिलं आणि आम्हालाच वाईट वाटलं, पण लगेच ती परत म्हणाली "मला काही नाही वाटते पण, बाबाच म्हणाले हे नवीन रंग घेवुन जा म्हणू...

Perfect!!

सक्काळी सक्काळी त्याच्याशी झालेलं भांडण... काल रात्रीपासूनच प्रोजेक्ट आणि असाईन्मेन्ट्सचं टेन्शन, त्यामुळेच अर्धवट झालेली झोप!! विचित्र हवा, भरपुर उकाडा आणि दमट वातावरण... त्यातुन कॉलेजला निघायला झालेला उशिर, वह्या-नोट्स भरताना..इथुन-तिथुन घरातून पळताना कामवाल्या बाईला लादी पुसायचा आलेला उत्साह! त्यावर एकदा धाप्प... असा आवाज... आता परत कपडे बदलायला हवे (कामवालीसुद्धा)!! घाई घाईत घातलेला अडस, मला मुळ्ळीच न आवडणारा ड्रेस... घरातुन निघताना आईने केलेले पराठे न खाल्ल्याने आईचा ओरडा! लिफ़्ट्मधे शेजारचे काका, १०९८दा "तू सध्या काय करत्येस?" प्रश्न विचारणार..म्हणुन धडाधडा पाय-या...पायाला मगाशी लागलंय, ही जाणीव! पळत पळ्त जाताना सुळसुळीत ओढणी सांभाळा की जड बॅग? की गळणारी पाण्याची बाटली? रिक्षा स्टॅंडवर एकच रिक्षा... तिच्या दिशेने जाणारे गोखले आजोबा... काय करु आजोबा, सॉरी! नशिब मागुन एक रिक्षा येत्ये! रिक्षात घमघमीत उदबत्ती... आयुष्यभरात पुन्हा कधी हॉर्न वाजवायला मिळणार नाही अश्या भावनेने रिक्षावाला हॉर्न बडवत होता! दीड मिनटांच्या एका सिग्नलला रिक्षा थांबल्यावर शेजारी "पुणे म.न.पा....

Then I'd best not catch this flick on you-tube

paranoid... मी नक्कीच paranoid बनत्ये! माझ्या मैत्रिणीला हल्ली you-tubeचं व्यसन लागायला लागलं आहे.. राव काहीही बघायचं का? आणि ते सुद्धा you-tube वर? "vdo बहॊत होते है यार.. और comments एक से एक होते है नीचे"..ती सांगत होती, मी तरी आत्तापर्यन्त शिव्याच वाचल्यात तिथे.. तिला तेच एक से एक वाटत असावं कदाचित! "अरे i want to upload something yar" ती सांगत आली.. आमच्या भुवया वर.. "something?"... "कुचभी यार" तिला माझ्या एका दुस-या classmateनी दिलेली सुचना "take some candid shots and make some film on movie-maker ya" तेव्हा पासनं तिनी तिचा कॅमेरा-मोबाईल बाहेर काढला की मी ज्याम वैतागत्ये... काही लोक धन्य असतात..ती महा-धन्य आहे... पण एका माशीवरुन मधमाशीचं पोळं बनवणारं माझं मन काही केल्या शांत व्हायला तयार नाहीये!! (आदित्य चोप्रा त्याच्या पुढ्च्या फिल्मसाठी शाहरुखची हिरोईन शोधण्यासाठी जंग जंग पछाडतोय असं वाचलं... तो you-tube पण बघतोय का?... नाही अशीच एक शंका!!)

minus minus plus...

आज मी भन्नाट आनंदात आहे... आज माझ्याबरोबर मास्टर्स करणाऱ्या २ मैत्रिणींना मी गणित शिकवलं, "क्या आप पाचवी पास से तेज है?" असं विचारल्यावर आता मी ’हो’ सांगु शकेन बहुतेक... म्हणजे मला खरचं हसावं की रडावं कळत नाहीये... त्यांच्या अज्ञानासाठी रडु की माझ्यापेक्षा जास्त मोठे ’गणिती औरंगजेब’ आहेत ह्यावर आनंद साजरा करु? a-b-c करताना तुम्ही काय करता हो? b-c करुन आलेलं उत्तर a मधुन वजा करता का हो? #@%$$$$ minus minus plus minus minus plus plus plus plus minus plus minus............

company

झेरॉक्ससाठी दुकानाबाहेर ताटकळत उभी होते, "ह्या मुलींना परीक्षेच्या वेळेलाच का नोट्स काढायच्या आठवतात? कित्ती गर्दी होते झेरॉक्सवाल्याकडे, आज त्याच्या बायकोला नविन साडी नक्की जाणारे" दुपारची १:३०ची वेळ, पोटात कावळे नाचत होते...उंदीर ओरडत होते! आणि वर रणरणतं उन! खरंतर बाजुलाच दाबेलीवाला आहे, त्याच्याकडे cold coffee पण सही मिळते... पण मी एकटीचं होते, कोणिही बरोबर नसताना एकटीचं खाणं मला कधीच आवडत नाही! त्यामुळेच बहुतेक ठाण्याला एकटी राहत असताना मी बारीक झाले होते! त्यामुळे भुक लागली असुन मी फक्त त्या चर्र.. होणा-या तव्याकडे आणि coffee च्या ब्लेन्डरकडे बघत बसले होते! तेवढ्यात तिथे एक आजोबा आले, कॉटनच्या पॅन्ट मधे खोचलेला सुती शर्ट, एक शबनम खांद्याला अडकवलेली, डोक्यावर पांढरीशुभ्र कॅप... "दाबेली आहे का रे?" अत्यन्त शुद्ध ब्राह्मणी उच्चार. "एक दे, इथेच, चटणी कमी" ..हे आजोबा इथे एकटेच उभे राहुन दाबेली खाणार? मला ते नाही रुचलं मनापासुन! मी पण पुढे झाले.. "एक दाबेली".. मग तिथे आजोबांबरोबर उभी राहुन दाबेली खाल्ली! ते माझ्याशी बोलले नाहीत.. मी त्यांच्याशी बो...

Open book test!

आज पेपर सुरु व्हायच्या आधी सगळ्यांना सांगत होते... "मॅडमना सांगुया ना open-book test घ्यायला". सगळ्या जणी हसल्या... "यार, तु तो बोलही मत, तेरी पढाई हो गयी होगी ना? " "हा हा.. और मॅम तो जैसे सुननेवाली है!" " ही mid-sem आहे बाळा, open-book testची स्वप्न नका बघु" मी फक्त सगळ्यांकडे खुन्नस देउन पाहिलं... मॅडम आल्या, त्यांनी पेपर वाटले... "ओह हे असं काही असतं का?" सारखे प्रश्न पडावे असा पेपर होता! अचानक त्यांचा मोबाईल वाजला... "yeah, the next building is my dept.. no no take left turn... wait i will come down" आणि लगबगीने खाली गेल्या... हळु हळु खुड्बुड होयला लागली.. एक मोठ्ठं फेकलेलं उत्तर संपवुन मी मान वर केली... सगळ्या साळकाय-माळकाया open-book test देत होत्या!

forget that count!

आधी विचार केला, आधीच्या ब्लॉगसारखं ह्याचं पहिलं पोस्ट टाकीन! ब्लॉग कितवा , पोस्ट पहिलं वगैरे... पण naah.. त्यात मज्जा नव्हती येत! though मी वरती लिहिलयं ह्या ब्लॉगबद्दल तरी पुन्हा एकदा... आज घरी यायला रिक्शा बघत असताना एक रिक्शा दिसली, रिक्शाजवळ गेल्यावर पाहिलं तो ३० -३५ वर्षाचा (असावा) रिक्शावाला सकाळबरोबर मिळणा-या ’बालमित्र’ मधला जोक वाचुन हसत होता. अश्या boring, interesting, crazy ब-याच गोष्टी घडत असतात... just असचं त्या लिहायच्यात! त्यावर अलंकारिक भाषेत किंवा ओढुन-ताणुन विनोद न करता लिहायच्यात! म्हणुन हा ब्लॉग! नेहेमीच्या routineमधे, नेहेमीच्या आयुष्यात...नेहेमीच्या जगण्याला जाणारे हे काही Tangents आहेत! this blog is about those Tangents, those lines, those things which touch my life at some point but never intersect it!