खोडरबर
आज बहिणीबरोबर स्टेशनरीच्या दुकानात गेले होते. जेव्हा जेव्हा असल्या दुकानांमध्ये जाते मला हरखुन जायला होतं. कसले ते वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर, "शॉपनर", पट्ट्या, पेन-पेन्सिली आणि काय काय नवीन नवीन! आणि त्या दुकानात एक ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र छान वास येतो तो तर वेड लावतो.. आजही डोक्यात काही काही गोष्टी पक्क्या राहिलेल्या आहेत.. एक दिवस मी एखाद्या मोठ्ठ्ठ्या दुकानात जाउन त्या सगळ्या विकत घेणारे! यत्ता पहिली वगैरे असेल.. अप्पुनी आणलेली काचेची पट्टी.. त्याच्या आत पाणी होतं.. त्यात प्लॅस्टिकचे मासे, चमकी वगैरे... अशीच इयत्ता पहिली-दुसरी... प्रियंकाची चौकोनी म्हणजे क्युबसारखी ट्रान्सल्युसन्ट डबी! तिमजली पेन्सिलबॉक्स.. रोहित किंवा प्रशांत..कोणाकडे तरी होता.. त्यावर मोगली, बगीरा आणि बलु होता... परत अप्पुच्याच अमेरिकेतल्या वगैरे मामाने डिस्नेचे काही प्रॉडक्ट्स पाठवले होते.. पेन्सिलच्या मागची एरिअल तर कसली भारी होती.. ती पण पाहिजे.. डिस्ने वाईट्ट आहे. माझ्याकडे त्यातलं काहीच नव्हतं कधीच... माझा कोणताच मामा, काका कधीच अमेरिकेत नव्हता.. नाहीये :( ( म्हणजे आता सगळं मिळतं भारतात.. पण अ...